Welcome to

TravelWorld

  • TRAVEL WORLD
    WELCOME TO
    KOLHAPUR

Welcome To Travel World

ट्रॅव्हल वर्ल्ड या कंपनीची स्थापना २०१६ साली पर्यटनाची राजधानी मानल्या गेलेल्या कोल्हापूरात झाली. भारतात असलेल्या प्रचंड पर्यटनाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करुन भारताला पर्यटनामध्ये जगात नंबर १ स्थानी पोहचवणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. पर्यटकांना पर्यटनातील सर्व सोयी सुविधा योग्यरित्या द्यायच्या हेतूने कंपनी वेबसाईट, मॅगझीन, ब्रोशर व अँड्रॉईड अॅपच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी पर्यटकांना पर्यटनांमध्ये सर्वोतोपरी सहकार्य करेल. याची सुरुवात शाहूनगरी कोल्हापूरातून करत आहोत. धन्यवाद.

- ट्रॅव्हल वर्ल्ड

कोल्हापूर पर्यटन


संपूर्ण कुटुंबासोबत पर्यटन करण्यासाठी भारतात सर्वप्रथम धार्मिक पर्यटनाला प्राधान्य दिले जाते यासाठी अनेक मोठमोठी प्राचीन मंदिरे, दर्गे, चर्च, जैन धर्मस्थळे व इतर धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातात. अशाच धार्मिक पर्यटनांचा पूरेपूर आनंद देण्यासाठी कोल्हापूर सज्ज आहे. इथे लोकप्रिय अंबाबाई मंदिर, जोतीबा, मलिक रेहान दर्गा, ऑल सेंट चर्च, बाहूबली इ. अनेक स्थळांनी येथील धार्मिक पर्यटन परिपूर्ण आहे.

View More


भारतात ऐतिहासिक पर्यटनाची क्रेझ असलेली दिसून येते. पर्यटक मोठ्या प्रमाणात अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देऊन तिथला इतिहास जाणून घेताना दिसत आहेत. कोल्हापूरात सुध्दा नवा राजवाडा, भवानी मंडप परिसर, साठमारी व ऐतिहासिक समाधी स्थळे इत्यादी विविध स्थळांमधून ऐतिहासिक पर्यटनाचा अनुभव घेता येतो. ही ऐतिहासिक ठिकाणे पाहताना आपण नक्कीच इतिहासात रमून जाल.

View More


विविध गोष्टींचे जतन करुन त्याव्दारे सत्य इतिहासावर प्रकाश टाकण्याचे काम संग्रहालयाव्दारे केले जाते. आज भारतात अनेक संग्रहालयाव्दारे हे काम उत्तमरित्या केले जात आहे. कोल्हापूरात छ. शहाजी वस्तू संग्रहालय, टाऊन हॉल, चंद्गकांत मांडरे, जी. कांबळे इ. संग्रहालयाव्दारे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक इत्यादी गोष्टींचे जतन करण्यात आले आहे. कोल्हापूरातील संग्रहालयाव्दारे जतन करुन ठेवलेल्या या मौलिक ठेव्याचा अनुभव घेण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध आहे.

View More


महाराष्ट्राच्या संरक्षार्थ जसा सह्याद्गी पर्वतरांगेचा सिंहाचा वाटा होता तसेच महाराष्ट्रातील किल्ल्यांनी सुध्दा संरक्षणामध्ये मोलाची कामगिरी बजावली होती. छ. शिवरायांना किल्ल्याचे महत्व माहित होते, त्यामुळे त्यांनी आपल्या हयातीत अनेक किल्ले वसविले. कोल्हापूरात पन्हाळा, रांगना भुदरगड इत्यादी १३ किल्ल्यांचा समृध्द वारसा, इतिहास प्रेमी व गडप्रेमींसाठी खुला आहे.

View More


कोल्हापूरला फार मोठ्या प्रमाणात जैवविविधता लाभलेली आहे. अभयारण्यात केलेली सफर अविस्मरणीय ठरते ती तेथील विविध प्राणी, पक्षी, नानाविध वृक्षराजी व निसर्गाला अगदी जवळून पाहिल्याच्या अनुभवामुळेच. कोल्हापूरात राधानगरी अभयारण्य तसेच त्यामधील दाजीपूर गवा अभयारण्य आणि कोल्हापूरच्या सीमेवरील चांदोली अभयारण्य ही जगप्रसिध्द अभयारण्ये इथे पर्यटकांच्या दिमतीला उभी आहेत.

View More


इतिहास अभ्यासक प्राचीन इतिहास जाणून घेण्यासाठी प्राचीन गुहा व लेण्यांना भेटी देत असतात त्यातून त्यांना तत्कालिन इतिहास जाणून घेण्यात मदत होते. इतिहास अभ्यासकांशिवाय अनेक पर्यटकसुध्दा पर्यटनांसाठी प्राचीन लेण्यांना आवर्जून भेटी देत आहेत. कोल्हापूरात मसाई, पोहाळे, पळसंबे इत्यादी लेणी तर मोरजाई, मसाई इत्यादी पठारे पर्यटनांसाठी उत्कृष्ठ आहे.

View More


पावसाळ्यात व पर्जन्यकाळ ओसरल्यानंतर पर्यटकांना धबधबे खुणाऊ लागतात. अनेक कुटुंबे, कॉलेज ग्रुप्स, फ्रेंड सर्कल्स या काळात धबधब्याचं प्लॅनिंग करतात. अशाच धबधब्यांचा मनसोक्त आनंद देण्यासाठी बर्की, राऊतवाडी, रामणवाडी इत्यादी धबधब्यांव्दारे कोल्हापूर सज्ज आहे.

View More


पर्यटक दिवसभर विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर सुर्यास्तावेळी पर्यटक शांत निवांतपणा अनुभवण्यासाठी सनसेट पॉईंटकडे धाव घेत असतात. सुर्यास्ताची मजा काही औरच असते. सुर्य ढगांच्या अडून लपत-छपत अनेक रंगांची उधळण करत जेंव्हा सुर्य अस्तास जातो तेंव्हा ते दृष्य विलोभनीयच असते. कोल्हापूरात असेच भान हरपून पाहण्यासारखे सनसेट पॉईंटस् आहेत. सातेरी, सोनतळी, शिदोबा डोंगर, रंकाळा, चंबूखडी येथील सुर्यास्त समईचे शोभा ती काय वर्णावी इथले सनसेट पॉईंटस् ग्रेटच आहेत.

View More


नव्यानेच सुरु झालेली कृषी पर्यटनाची संकल्पना महाराष्ट्रच्या मातीत चांगलीच रुजली आहे. अनेक पर्यटक महागड्या हॉटेल्स ऐवजी कृषी पर्यटन केंद्गांना पसंती देत आहेत. कृषी पर्यटन केंद्गामध्ये पर्यटकांना अस्सल गावरानपणा अनुभवता येतो. अशाच गावरनपणाचा अनुभव देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्गे तत्पर आहेत.

View More


नुसतं वॉटरपार्क म्हटलं तरी धम्माल मस्ती, मौजमजा अशा शब्दांची अनुभूती येते. कारण मुळी धम्मालपणासाठीच वॉटरपार्कस् असतात. अशाच धम्माल अनुभवासाठी कोल्हापूरात महाराष्ट्रात प्रसिध्द असलेले वॉटरपार्कस् आहेत.

View More


पर्यटनामध्ये हॉटेल्सना फार मोठे स्थान आहे कारण दिवसभर फिरल्यानंतर पर्यटक विश्रामासाठी चांगल्या हॉटेल्सना पसंती देतात. कोल्हापूरात सर्व स्तरातील पर्यटकांना योग्य हॉटेल्स, भक्त निवास, यात्री निवास, डॉरमेट्री ची उत्तम सोय आहे.

View More


पर्यटनामध्ये पर्यटक विविध शहरातील तिथले वेगवेगळे स्पेशल पदार्थ खाण्यासाठी उत्सुक असतात. त्या-त्या भागातील निरनिराळे पदार्थ चाखण्याची मजा काही औरच. कोल्हापूरात कोल्हापूरी स्पेशल भेळ, मिसळ, वडा पाव, तांबडा-पांढरा रस्सा, मटण लोणचे इत्यादी अनेक पदार्थ आपल्या जिभेचे चोचले पूरवण्यासाठी सज्ज आहेत.

View More


विविध शहरात पर्यटन करताना आपण त्या-त्या शहरातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी खरेदी करत असतो. भारतात काश्मिरी शाल, सोलापूरी चादर इत्यादी गोष्टी पर्यटक आवर्जून खरेदी करतात. तशी प्रत्येकाला अशा गोष्टी खरेदी करण्याची हौस असतेच तर अशीच हौस पूरवण्यासाठी कोल्हापूरात कोल्हापूरी चप्पल(पायतान), गुळ, काकवी, साज, मसाले इत्यादी तयार आहेत.

View More